Avkali crop insurance अवकाळी नुकसान भरपाई दुप्पट दराने GR आला 36,000 हेक्टरी

Avkali crop insurance अवकाळी नुकसान भरपाई दुप्पट दराने GR आला 36,000 हेक्टरी

Avkali crop insurance :- राम राम मंडळी सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आलेली आहेत. अवकाळी नुकसान भरपाई 2023 नोव्हेंबर यादरम्यान अवकाळी पावसाने गारपिटीने आणि वादळी वाऱ्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत. अशा सर्वत्र शेतकऱ्यांना नक्कीच मदत देणार असे आवाहन मुख्यमंत्र्यां द्वारे हिवाळी अधिवेशनात करण्यात आले होते तसेच वेळोवेळी करण्यात येत आहे.

today Maharashtra rate नवीन वर्षातील कापूस सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर येथे सर्वात जास्त दर

today Maharashtra rate
today Maharashtra rate

मात्र आता सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे सरासरी राज्यातील 32 जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झालेले दिसून आले होते आणि 32 जिल्ह्यातील पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत. शेतकऱ्यांना जी मदत दिली जाणार आहे ती केंद्र सरकारकडून 75 टक्के व राज्य सरकारकडून 25% याप्रमाणे दिले जाते.

Avkali crop insurance :- नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले यासाठी आतापर्यंत साधारणता एक हेक्टर मर्यादेपर्यंत मदत दिली जात होती परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे ती पुढील प्रमाणे पाहणार आहोत. तसेच सर्वत्र शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी सरकारमार्फत जारी करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : PM kisan and namo farmer scheme date पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार..!

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 8,500 रुपये प्रति हेक्टर असे दिली जात होती आणि ही मदत प्रती शेतकरी 2 हेक्टर च्या मर्यादी पर्यंत दिली जात होती परंतु यामध्ये वाढ आता करण्यात आलेले आहेत. 13,600 रुपये प्रति हेक्टर आणि पात्र शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत आता दिली जाणार आहेत.. म्हणजे यामध्ये साधारणतः दुपटीने वाढ करण्यात आलेली आहेत शेतकऱ्यांना जिथे प्रतिहेक्टर 8,500 मदत दिली जात होती ती आता 13,600 रुपये प्रती हेक्टर अशी करण्यात आलेली आहेत.

Avkali crop insurance :- तसेच बागायत पिकांच्या नुकसानीसाठी देखील मोठा दिलाचादायक अहवाल समोर आलेला आहे सरासरी बागायत पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत आतापर्यंत दिली जात होती आणि ही मदत साधारणता 2 हेक्टर च्या मर्यादीपर्यंत दिली जात होती परंतु यामध्ये प्रती हेक्टरी 27,000 रुपये मदत आता दिली जाणार आहेत आणि ही मदत पात्र शेतकऱ्यांना साधारणता 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहेत. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहेत.

शेतकरी मित्रांनो जिरायत व बागायत पिकांच्या मदतीमध्ये झालेली वाढ आपण पाहिली आहेत परंतु त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीची मदत देखील आता वाढवण्यात आलेली आहेत. बहुवार्षिक म्हणजे फळबाग उत्पादक शेतकरी जे एका पिकाची लागवड केल्यानंतर अनेक वर्षापर्यंत त्याच पिकांचे पालन पोषण करतात अशा पिकांना अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कारण यांचा उत्पादनाचा कालावधी हा मोठ्या प्रमाणात असतो त्यासाठी यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे.

Avkali crop insurance :- बहुवार्षिक [फळबाग] पिकांच्या नुकसानीसाठी मदत साधारणता आतापर्यंत 22,500 ुपये प्रति हेक्‍टरी अशी मदत दिली जात होती आणि ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जात होती. परंतु आता यामध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना 36,000 रुपये अशी दिली जाणार आहे आणि ही मदत 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जाणार आहेत. त्यामुळे यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहेत.

शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक पिकांच्या मदतीमध्ये वाढ करण्यात आलेले आहेत यामध्ये आता लागणारी रक्कम देखील जास्त प्रमाणात लागणार आहे त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात पैशाची तरतूद करून पात्र शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार याद्या जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची जाहीर केलेले यादीनुसार रक्कम वाटप करण्यात येईल.Avkali crop insurance

पुढे वाचा….

Leave a comment